सोमैया विद्यापीठात विविध भाषा शिकण्याची संधी
भाषाविषयांतील प्रमाणपत्र ते पदव्युत्तर अशा विविध पातळ्यांवरील अभ्यासक्रम घेऊन येत आहे सोमैया विद्यापीठाचा भाषा आणि साहित्य विभाग
भाषा – मग ती एखादी भारतीय भाषा असो, युरोपीय किंवा आशियाई – ती नेहमीच अनेकानेक संधी उपलब्ध करून देत असते. त्यामुळे मग ती भाषा आणि त्या भाषेचे जाणकार यांनाही मागणी असतेच. ती मागणी ओळखून सोमैया विद्याविहार विद्यापीठाचा भाषा आणि साहित्य विभाग २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून भाषाविषयक विविध नवे अभ्यासक्रम घेऊन येतोय.
मराठी, गुजराती, हिन्दी या आधुनिक भारतीय भाषांना आलेलं महत्त्व आणि या भाषांच्या जाणकारांसाठी असलेल्या संधी लक्षात घेऊन चार नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या भाषा विभागातर्फे सुरू करण्यात येत आहेत. एम. ए. – मराठी भाषा, साहित्य आणि उपयोजित मराठी, एम. ए. – गुजराती साहित्य, अनुवाद आणि प्रसारमाध्यमे आणि एम. ए. – हिन्दी भाषा आणि साहित्य असे हे अभ्यासक्रम असतील. यांव्यतिरिक्त एम. ए. इंग्लीश लिटरेचर अँड कम्युनिकेशन स्टडिज् हा एक वेगळा असा अभ्यासक्रमही सुरु करण्यात येत आहे.
सध्या कन्टेंट राईटर्सना असलेली मागणी लक्षात घेता डिप्लोमा ईन कन्टेंट अँड क्रिएटीव्ह राईटिंग हा एक बहुभाषी अभ्यासक्रम इच्छुकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विविध युरोपीय तसेच आशियाई भाषा शिकण्याची संधीही विद्यापीठात उपलब्ध आहे. जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, ईटालियन, जपानी, मॅन्डरिन (चिनी), उर्दू तसेच अन्यभाषकांसाठी कम्युनिकेटीव्ह मराठी आणि गुजराती कम्युनिकेशन स्किल्स असे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टीफिकेट कोर्स) सुरू करण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूनेच या सर्व अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
आपल्या देशाने घेतलेली आर्थिक झेप, वैज्ञानिक, तांत्रिक, औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्थापिलेलं स्वत:चं वर्चस्व यांमुळे अर्थातच भारत आणि इतर देशांत चालणारा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा व्यापार हेच दर्शवतो की भाषांना आणि पर्यायाने भाषातज्ज्ञांना आलेलं अनन्यसाधारण महत्त्व पुढे वाढतच जाणार आहे. आणि मग अशा सुवर्णसंधीचा फायदा आपण का बरं करून घेऊ नये?
प्रा. कृत्तिका भोसले – सोमैया विद्याविहार विद्यापीठ
अधिक माहितीसाठी – https://fll.somaiya.edu/en
संपर्क – dean.fll@somaiya.edu, bhumi@somaiya.edu, sagar.c@somaiya.edu
Add comment