Blog

विदेशी व भारतीय भाषा शिकण्याच्या संधी – सोमैया विद्यापीठ

सोमैया विद्यापीठात विविध भाषा शिकण्याची संधी 

भाषा – मग ती एखादी भारतीय भाषा असो, युरोपीय किंवा आशियाई – ती नेहमीच अनेकानेक संधी उपलब्ध करून देत असते. त्यामुळे मग ती भाषा आणि त्या भाषेचे जाणकार यांनाही मागणी असतेच. तर जाणून घेऊ या, अशा कोणकोणत्या संधी भाषेच्या जाणकारांसाठी उपलब्ध आहेत. 

भाषा प्रशिक्षक / शिक्षक 

आज अनेक शाळांमध्ये, कॉलेजेस मध्ये किंवा विद्यापीठांतही भाषा प्रशिक्षकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांतही त्यांच्या employees ना त्या भाषेची थोडक्यात ओळख किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी निगडीत भाषाज्ञान देण्यासाठीही भाषातज्ज्ञांची गरज भासत असते. 

बहुराष्ट्रीय कंपन्या, बॅंका 

विविध राष्ट्रांच्या कंपन्यांमध्ये, बॅंकांमध्ये भाषातज्ज्ञ, दुभाषा, language analyst म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. शिवाय अनेक IT Firms, Call Centres, KPOs, BPOs, SAP, Consulates मध्येही करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. 

क्रॉस कल्चरल ट्रेनर 

थोडं अनकॉमन पण खूप इन्ट्रेस्टींग असं हे क्षेत्र. बहुराष्ट्रीय कंपन्या, बॅंकांमध्ये जशी अनुवादक / दुभाषांची गरज असते तशीच क्रॉस कल्चरल ट्रेनरचीही. अट इतकीच की दोन्ही भाषांसोबतच त्या दोन्ही संस्कृतींची व्यवस्थित जाण तुम्हाला असायला हवी. भाषा शिकणाऱ्यांना जर पुढे जाऊन त्या देशात काम करण्याची अथवा स्थायिक होण्याची इच्छा असेल तर त्या देशाची संस्कृती, तिथलं राहणीमान, परंपरा इ. ची इत्यंभूत माहिती असणंही आवश्यक असतं. आणि त्यामुळेच भाषा शिकताना अशा क्रॉस कल्चरल ट्रेनिंगसाठीही लोकांची भरपूर पैसे मोजण्याची तयारी असते. 

दुभाषा 

भाषाज्ञान व सामान्य ज्ञान या दोहोंची नितांत गरज असणारे हे क्षेत्र. अशा दुभाषांना अनेक युरोपीय, आशियाई पर्यटकांची पसंती असते. परकीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे आदानप्रदान होण्यासाठीसुद्धा दुभाषांची मदत होते. 

प्रशासकीय सेवा 

प्रशासकीय सेवांसाठी असणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन I.F.S. (Indian Foreign Services) मध्ये नोकरी मिळू शकते. पुढे अशा भाषातज्ज्ञांची नियुक्ती परदेशातल्या भारतीय दूतावासात होऊ शकते. 

Tourism and Hospitality 

या क्षेत्रांमध्येही भाषातज्ज्ञ, दुभाषा यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. 

अनुवादक 

अतिशय समृद्ध असे परकीय भाषांतील साहित्य भारतीय भाषांमध्ये अनुवादीत करण्यासाठी किंवा भारतीय साहित्याचा इतर भाषकांना आस्वाद घेता यावा यासाठी प्रशिक्षित अनुवादकांची गरज असते आणि असे अनुवादक नेहमीच मागणीत असतात. 

कुठे शिकता येतील या भाषा? 

मुंबईच्या सोमैया विद्याविहार विद्यापीठात विविध भाषांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येतील. 

  • जर्मन 
  • फ्रेंच 
  • स्पॅनिश 
  • ईटालियन 
  • जपानी 
  • मॅन्डरिन (चिनी) 
  • उर्दू 
  • अन्यभाषकांसाठी कम्युनिकेटीव्ह मराठी 
  • गुजराती कम्युनिकेशन स्किल्स

यांशिवाय मराठी, गुजराती, हिन्दी या आधुनिक भारतीय भाषांना आलेलं महत्त्व आणि या भाषांच्या जाणकारांसाठी असलेल्या संधी लक्षात घेऊन चार नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या भाषा विभागातर्फे सुरू करण्यात येत आहेत. 

एम. ए. – मराठी भाषा, साहित्य आणि उपयोजित मराठी 

एम. ए. – गुजराती साहित्य, अनुवाद आणि प्रसारमाध्यमे 

एम. ए. – हिन्दी भाषा आणि साहित्य 

एम. ए. – इंग्लीश लिटरेचर अँड कम्युनिकेशन स्टडिज् 

सध्या कन्टेंट राईटर्सना असलेली मागणी लक्षात घेता डिप्लोमा ईन कन्टेंट अँड क्रिएटीव्ह राईटिंग हा एक बहुभाषी अभ्यासक्रम इच्छुकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

प्रा. कृत्तिका भोसले – सोमैया विद्याविहार विद्यापीठ

अधिक माहितीसाठी – https://fll.somaiya.edu/en 

संपर्क – dean.fll@somaiya.edu, bhumi@somaiya.edu 

Add comment

Follow us

Don't be shy, get in touch. We love meeting interesting people and making new friends.